नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात WhatsApp चा वापर वाढताना दिसत आहे. असे असताना आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी एक्स चॅट नावाची एक नवीन मेसेजिंग सेवा सुरू केली आहे. ती फक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर वापरली जाऊ शकते. या चॅट सेवेचा वापर करून, ते मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि स्थानिक अॅप अराताईशी स्पर्धा करण्याचा विचार आहे.
एक्स चॅट ही मेसेजिंग सेवा अनेक नवीन फीचर्ससह लाँच करण्यात आली. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि एक स्वतंत्र मेसेजिंग इनबॉक्स आहे. हे फीचर्स सुरू झाल्यानंतरही, युजर्स नवीन मेसेजिंग सेवेअंतर्गत प्राप्त झालेले डीएम आणि संदेश स्वतंत्रपणे पाहू शकतील. एलॉन मस्क यांनी पोस्ट केले की, एक्सने पूर्णपणे नवीन सेवा सुरू केली आहे. एन्क्रिप्टेड मेसेजिंग, ऑडिओ, व्हिडिओ आणि फाईल ट्रान्सफर शक्य होतील. इतकेच नाहीतर एक्स मनीही लवकरच रिलीज होईल.
एलॉन मस्क यांनी केलेल्या पोस्टवरून असे दिसते की, एक्स मनी या मनी ट्रान्सफर सेवेवर देखील काम करत आहेत. कंपनीने एक्स मनी भारतात लाँच होईल की नाही हे सांगितले नाही. भारतात अनेक अॅप्स मनी ट्रान्सफर सेवा देतात. त्यामुळे हे भारतात होईल की नाही याची स्पष्टता नाही.
स्क्रीनशॉट येतात ब्लॉक करता
चॅट प्रायव्हसी लक्षात ठेवून, एक्स चॅटमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करता येतात. दुसरा युजर इच्छित असला तरीही सिक्रेट मेसेजेसचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.


