Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ramesh Pardeshi : मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाईचा भाजपात प्रवेश; एका रात्रीत गेम फिरवला, पुण्यातील चित्रपट सेनेत खिंडार

Ramesh Pardeshi : मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाईचा भाजपात प्रवेश; एका रात्रीत गेम फिरवला, पुण्यातील चित्रपट सेनेत खिंडार

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय पटावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. अभिनेते रमेश परदेशी, म्हणजेच ‘पिट्या भाई’, यांनी राज ठाकरे यांच्या मनसे सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्याच्यासोबतच पुण्यातील मनसे चित्रपट सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला असून, यामुळे पुण्यात मनसेला एका रात्रीतच मोठे नुकसान झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

पिट्या भाई, जे ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटासाठी ओळखले जातात, हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या सोबतच चित्रपट सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही कमळाची साथ स्वीकारली आहे. यामुळे पुण्यातील मनसेची ताकद कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे, विशेषतः निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल महत्त्वाचे ठरते.

राज ठाकरेंच्या शब्दांनी सुरू झाला वाद

पिट्या भाई यांनी मनसे सोडण्याचे कारण राज ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदांना दिले आहे. काही दिवसांपूर्वी रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गणवेशातील आपला फोटो शेअर केला होता. यासोबत ‘मी माझ्या विचारांसोबत’ असा मजकूर जोडला होता.

पुण्याच्या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी या पोस्टवरून त्यांना झापल्याची चर्चा आहे. यानंतर पिट्या भाई यांनी सूचक पोस्ट केली होती, ज्यात ‘नव्या जबाबदाऱ्यासाठी सज्ज’ असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतरच त्यांनी मनसेला रामराम ठोकला आणि भाजपकडे वळले.

भाजपमध्ये प्रवेश करताना पिट्या भाई यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. “राज ठाकरेंनी मला अपमानित केला, त्यामुळे मी मनसे सोडली,” असे त्यांनी स्पष्ट केले. ही घटना मनसेसाठी फक्त वैयक्तिक नुकसान नाही, तर पुण्यातील पक्षाच्या संघटनात्मक रचनेला धक्का देणारी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!