Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पहिल्यांदाच IAS अधिकाऱ्याकडे शिक्षण मंडळाची धुरा! त्रिगुण कुलकर्णी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

पहिल्यांदाच IAS अधिकाऱ्याकडे शिक्षण मंडळाची धुरा! त्रिगुण कुलकर्णी यांची अध्यक्षपदी नियुक्ती

MSBSHSE Chairman: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. IAS अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतपणे देण्यात आली असून, या नियुक्तीमुळे राज्य मंडळाच्या कामकाजात नवीन प्रशासकीय दृष्टीकोनाची भर पडणार आहे.

कोण आहेत त्रिगुण कुलकर्णी?

कुलकर्णी हे सध्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत. राज्य मंडळ ही शिक्षण विभागाखालील स्वायत्त संस्था असून, महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा घेण्याची प्राथमिक जबाबदारी ही मंडळाचीच आहे. आजवर राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नियुक्त शिक्षण सेवा अधिकाऱ्यांची निवड केली जात असे. या परंपरेनुसारच मागील अध्यक्ष शरद गोसावी यांनी तीन वर्षे कार्यभार सांभाळल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालकपदी बदली स्वीकारली.

हेही वाचा – Pune Petrol Pump : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; काय आहे कारण?

गेल्या वर्षभरापासून त्यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभारही हाताळला होता. मात्र, यावेळी शासनाने नव्या पद्धतीने निर्णय घेत IAS अधिकाऱ्याला राज्य मंडळाच्या प्रमुखपदी नेमले आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या ५०+ वर्षांच्या इतिहासात हा पहिल्याच बदल ठरला आहे.

राज्य मंडळाच्या आगामी जबाबदाऱ्या

फेब्रुवारी–मार्च 2025 दरम्यान होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांची जबाबदारी नव्या अध्यक्षांकडे असेल. दरवर्षी साधारण 32 लाख विद्यार्थी या परीक्षा देतात, तर जुलै–ऑगस्टमध्ये फेर परीक्षा आयोजित केली जाते. हे परीक्षाकेंद्र पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये विखुरलेले आहेत. राज्य मंडळाने नुकतेच 2025 च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, आता या सर्व प्रक्रियेचे नेतृत्व IAS अधिकारी त्रिगुण कुलकर्णी करणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!