Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

माझे अवयव दान करा…; दिल्लीत सांगलीच्या विद्यार्थ्याची शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

माझे अवयव दान करा…; दिल्लीत सांगलीच्या विद्यार्थ्याची शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Sangli Student Suicide: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या सततच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी मारत शौर्य प्रदीप पाटील(वय 15) या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा असून त्याचे वडील प्रदीप पाटील गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये व्यवसाय करतात. हे कुटुंब दिल्लीतील राजीव नगर परिसरात वास्तव्यास आहे. शौर्य सेंट कोलंबस विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होता.

घटना कशी उघडकीस आली?

मंगळवार, दुपारी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून एका विद्यार्थ्याने उडी मारल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत शौर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यावेळी त्याचे वडील कामानिमित्त सांगलीला गेले होते. माहिती मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. शौर्यवर आज गावी ढवळेश्वर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा – नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

बॅगेत सापडली सुसाईड नोट

शौर्यच्या स्कूल बॅगेत पोलिसांना एक दीड पानांची सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने शिक्षिकांकडून होणारा मानसिक छळ सहन करणे अशक्य झाल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. “स्कूलवालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा…” असे त्याने नमूद केले आहे. त्याचबरोबर आपल्या पालकांची क्षमा मागत, आवश्यक असल्यास आपल्या अवयवांचे दान करावे, अशीही विनंती त्याने त्यात केली.

४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुसाईड नोटच्या आधारे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने दिल्लीतील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळेतील मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!