Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

नाशिक: हुंड्यासाठी विवाहितेच्या छळाच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजले होते, या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला होता. मुलीच्या वडिलांनी लग्नात अलिशान कार गिफ्ट देऊनही मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं होतं. त्यानंतर, अद्यापही असे प्रकार राज्यात घडत असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याने संतप्त कुटुंबीयांनी सासरच्या दारातच आपल्या लेकीची चिता पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी, सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले. मोबाईल, गाडी व घरून पैसे आण, अशा वारंवार मागण्या, यावरून नेहमी वाद व शिवीगाळ केली जात असल्याने विवाहिता कंटाळली होती. सासरी सातत्याने होणाऱ्या या छळामुळे मोहिनी चंद्रकांत अहिरे हिने टोकाचे पाऊल उचलले.

22 वर्षीय विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती समजताच माहेरच्या नातेवाईकांनी सासरी धाव घेत जाब विचारला. त्यानंतर, दोन्ही कुटुंबात झालेल्या वादानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांना तिच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांना दारात मुलीच्या मृतेदावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला. या प्रकरणी तिच्या पतीसह 6 जणांवर चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल केला असून यातील सर्व संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!