Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

उद्धव ठाकरेंना धक्का! वाशिम उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडेंचा राजीनामा; अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय

उद्धव ठाकरेंना धक्का! वाशिम उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडेंचा राजीनामा; अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय

वाशिम: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर आणि सोईच्या पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या च पक्षबदलामुळे महायुतीमध्ये मोठे नाराजीनाट्य रंगले. या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आपापल्या पक्षातील पदाधिकऱ्यांना प्रवेश द्यायचा नाही, असे आता महायुतीत ठरलेल आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील पदाधिकारी, स्थानिक नेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही ठिकाणी तर महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच आता ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे. उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे तडकाफडकी राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा देताना ठेंगडे यांनी धक्कादायक असे आरोप केले आहेत. वाशिमची नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होते. आता ऐन निवडणुकीत त्यांनी वाशिमच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यासाठी आलेला एबी फॉर्म जिल्हाप्रमुखांनी स्वतःच्या पत्नी रेखा मापारी यांच्या अर्जाला जोडला आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी वाशिम नगरपरिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची घोषणा केल आहे.

ठेंगडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार

नाराज ठेंगडे यांनी उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता वाशिममध्ये ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. ठेंगडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!