Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात भीषण दुर्घटना! कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियनचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

पुण्यात भीषण दुर्घटना! कुत्रा मागे लागल्याने इलेक्ट्रिशियनचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Pune News: पुण्यातील कसबा पेठ भागातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय इलेक्ट्रिशियनला चक्क एका कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला. कामानिमित्त इमारतीत गेलेल्या रमेश गायकवाड यांचा कुत्रा मागे लागल्याने तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. 1 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेच्या दिवशी रमेश गायकवाड हे सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये एका सहकाऱ्यासोबत इलेक्ट्रिकचे काम पाहत होते. ते तिसऱ्या मजल्यावर असताना, चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या सिद्धार्थ दिलीप कांबळे (वय 24) यांच्या कुत्र्याने अचानक त्यांच्याकडे धाव घेतली. त्या अनपेक्षित प्रसंगाने घाबरलेले रमेश पळून जाण्याच्या प्रयत्नात जिन्याजवळील डक्टमध्ये कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारांचा काहीही उपयोग झाला नाही.

हेही वाचा – Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास बसणार दंड, थंडीच्या दिवसात महापालिकेचा अजब निर्णय

या प्रकरणी मृताचे पत्नी जया गायकवाड (वय 40) यांनी तक्रार दिल्यानंतर कुत्र्याचा मालक सिद्धार्थ कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्र्याला मोकळे सोडणे आणि योग्य नियंत्रण न ठेवणे यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!