Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कचऱ्यात 10 लाखांची बॅग…पण लालच नाही! पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेने मालकाला शोधून परत केले पैसे

कचऱ्यात 10 लाखांची बॅग…पण लालच नाही! पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेने मालकाला शोधून परत केले पैसे

Pune News: पुणे शहरात एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, आजही समाजात प्रामाणिकता आणि माणुसकी जिवंत असल्याचे सुंदर उदाहरण समोर आले आहे. सदाशिव पेठ भागात कचरा गोळा करणाऱ्या अंजू माने यांनी रस्त्यावर पडलेली दहा लाख रुपयांची बॅग मूळ मालकापर्यंत पोहोचवत सर्वांची मने जिंकली.

कर्तव्यावर असतानाच सापडली बॅग

सकाळी नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी अंजू माने या जात होत्या. फीडर पॉइंटकडे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. आधीही औषधांच्या बॅगा परिसरात सापडल्या असल्याने त्यांनी ती बॅग उचलून सुरक्षित ठेवली. मात्र, बॅग उघडताच आत औषधांबरोबरच दहा लाख रुपयांची रोख रक्कम पाहून त्या थोड्या वेळासाठी थबकल्या.

20 वर्षांचा अनुभव आणि प्रामाणिकता

या भागात तब्बल दोन दशके सेवा देत असलेल्या अंजू ताईंनी घाबरण्याऐवजी तातडीने मालक शोधण्याचे ठरवले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने चौकशी सुरू झाली. त्याचदरम्यान एक व्यक्ती अत्यंत बेचैन अवस्थेत काहीतरी शोधत फिरताना दिसला. अंजू ताईंनी त्याला जवळ बोलावून शांत केले आणि बॅग त्याचीच असल्याची खात्री होताच दहा लाख रुपये ताब्यात दिले.

हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अंजू ताईंसाठी कौतुकाचा वर्षाव

बॅग परत मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने आणि आसपासच्या नागरिकांनी अंजू माने यांच्या प्रामाणिकतेचे मनापासून कौतुक केले. परिसरातील रहिवाशांनी त्यांचा साडी आणि रोख स्वरूपात सत्कार केला. त्यांच्या हातून बॅग सुरक्षित हातात पोहोचली हे पाहून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. “हे पैसे माझे नव्हते. योग्य ठिकाणी पोहोचवणं हे माझं कर्तव्यच होतं,” असे अंजू ताईंनी नम्रपणे म्हटले.

ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड

या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, गेल्या वीस वर्षांत स्वच्छ संस्थेतील कचरा वेचकांनी पुणेकरांमध्ये एक अनोखा विश्वास निर्माण केला आहे. ४० लाख नागरिकांना सेवा देणाऱ्या ४००० स्वच्छ कर्मचाऱ्यांमध्ये अशीच निष्ठा आणि पारदर्शकता दिसते. या प्रेरणादायी कृतीची दखल घेत आमदार हेमंत रासने यांनी स्वतः अंजू माने यांचा सन्मान केला. त्यांना पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले आणि भेटवस्तू देण्यात आल्या. त्याचबरोबर, “स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा” या मोहिमेत नवीन ऊर्जा भरत अंजू माने यांची ‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि प्रामाणिक कसबा अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!