Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे: पुणे गृहनिर्माणक्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) (Mhada) पुणे, (pune) पिंपरी-चिंचवडपीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186 सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, पुणेकरांना किंवा पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे.

पुण्यातील 4186 सदनिकांसाठी आतापर्यंत1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,33,885 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत दि. 11 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे. दिनांक 30 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. दिनांक 1 डिसेंबर, 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

तांत्रिक कारणामुळे अर्जदारांना अडचणी

काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आल्याने व अनेक नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करणेसाठी तसेच इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याविषयी मागणी करण्यात आली. नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शेवटची संधी म्हणून दिनांक 30 नोव्हेंबर, 2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इतर मजकुर पुर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1683 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 299 सदनिका, 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील 864 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3222 सदनिकांचा समावेश आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!