पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर येथील वन विभागात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नागपूर येथील वन विभागात सेवानिवृत्त कायदेशीर अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त कायदेशीर अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरी ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : ६५ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० डिसेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासकीय दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्यामार्फत, वन भवन रोड, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


