महिलांसह पुरुषांनाही आपले केस चांगले असावे असे वाटत असते. महिला लांबसडक केसांसाठी काहीना काही उपाय करताना दिसून येतात. जर तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात तर आता काळजी करण्याची गरज नाही. तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. केस गळती आता रोखता येऊ शकते.
पाणी आणि औषधी उपाय केल्याने केस अचानक वाढतील, असे नाही. सर्वप्रथम, केस गळतीचे प्रकार ओळखणे महत्त्वाचे आहे. कधीकधी शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात, कधीकधी ऑटोइम्यून रोगांमुळे ही गळती होते. कधीकधी पुरुषांच्या टक्कल पडल्यामुळे केस गळतात, जे नैसर्गिक आहे. टक्क पडणे ही समस्या फक्त पुरुषांसाठी नाही. तर महिलांनाही वेगवेगळ्या नमुन्यांसह टक्कल पडण्याचा अनुभव येऊ शकतो. ते टाळण्यासाठी, प्रथम कारण समजून घेणे महत्वाचे आहे.
एकदा आपल्याला कारण सापडले की, आपण जीवनसत्त्वे पूरक आहार घेऊन ही समस्या आटोक्यात आणू शकतो. जर हार्मोनल समस्या असेल तर आपण ती व्यवस्थापित करतो आणि जर जीवनशैलीशी संबंधित समस्या असेल तर आपण त्यामध्ये काही बदल करून ती सोडवूही शकतो. आता सर्व काही उपलब्ध आहे, मात्र, तुमचे केस १००% पूर्ववत करता येत नाहीत. तुमचे केस गळतील आणि तुम्ही ते थांबवू शकत नाही. त्यामुळे याकडेही लक्ष देणं गरजेचे आहे.


