पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, बीड जिल्ह्यातील एका बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड येथे शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, शाखा विकास अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बीड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, शाखा विकास अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 16 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बीड.
– वयोमर्यादा : शाखा व्यवस्थापक : कमाल ४० वर्षे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक : कमाल ३५ वर्ष, शाखा विकास अधिकारी : ३० वर्ष
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://shahubank.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


