Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

फडणवीसांनी गेम फिरवला; काँग्रेसला मोठा धक्का, कोपरगावचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

फडणवीसांनी गेम फिरवला; काँग्रेसला मोठा धक्का, कोपरगावचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

दौंड: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पहायला मिळालं. दरम्यान अजूनही महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान आज कोपरगावचे काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शहराध्यक्ष पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील धक्का बसला आहे. तुषार पोटे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कलविंदर दडीयाल यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी भाजपच्या लोकशाही आघाडीच्या वतीनं शहर विकासाचा जाहिरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!