Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Road Safety Awareness: रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेचा ‘प्रयास’; RTO कडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

Road Safety Awareness: रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेचा ‘प्रयास’; RTO कडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

Road Safety Awareness: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी “युवकांसाठी रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन (प्रयास)” या अभ्यासक्रमांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

वाहतूक नियम आणि परवाना प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), बारामती येथील निरीक्षक प्रियंका सस्ते उपस्थित होत्या. त्यांनी ‘वाहतूक नियम, चिन्हे आणि परवाना’ या विषयावर विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर, वेग मर्यादेचे पालन आणि जबाबदार वाहनचालक असण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच, वाहन परवाना मिळवण्याची प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शंका निरसन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे होते. रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि वाहतूक सिग्नलचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील या सत्रात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि रस्ते सुरक्षिततेबाबत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबाबत नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि संयोजन
या प्रसंगी वाणिज्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तेजश्री हुंबे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुजाता निंबाळकर यांनी केले. शेवटी प्रा. ज्ञानेश गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे, प्रा. योगेश खरात, प्रा. महादेव माळवे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!