नवी दिल्ली : सध्या अनेक नवनवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Motorola ने भारतात Moto G57 Power 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे फीचर म्हणजे यात ७०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ३३W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
Moto G57 Power ची किंमत १४९९९ रुपये आहे. यात ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज आहे. कंपनीच्या मते, Motorola च्या विशेष सवलतीमुळे तो १२९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Moto G57 Power मध्ये ६.२-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा एलसीडी पॅनेल आहे आणि १२०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तो गोरिल्ला ग्लास ७i ने प्रोटेक्टेड आहे. आस्पेक्ट रेशो २०:९ आहे आणि डिस्प्ले स्मार्ट वॉटर टच २.० ला देखील सपोर्ट करतो.
Moto G57 Power क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६s जेन ४ प्रोसेसर यामध्ये असणार आहे. या ड्युअल-सिम फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सेलचा आहे. ट्रिपल रियर कॅमेरा आहे. यात एक ५०MP कॅमेरा आणि दुसरा ८MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा लेन्स देण्यात आला आहे.


