आपल्यापैकी अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसतो. त्यात लोकांना अनेकदा आहाराबाबत अनेक प्रश्न असतात, ज्यात काय खावे आणि काय खाऊ नये. सोशल मीडियावरील वेगवेगळे व्हिडिओ त्यांच्या गोंधळात आणखी भर घालतात, काही जण म्हणतात की एक गोष्ट खावी तर काही जण म्हणतात की दुसरी गोष्ट टाळावी. त्यामुळे पुन्हा गोंधळ होतो.
प्रोटीनसाठी अंडी, पनीर की चिकन खाण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र, काही लोक पनीरला चांगले मानतात, काही अंडी आणि काही चिकन. १०० ग्रॅम पनीरमध्ये २६५ कॅलरीज, १८ ग्रॅम प्रथिने, २०-२१ ग्रॅम फॅट्स आणि १-२ ग्रॅम कार्ब असतात. पनीरमध्ये हळूहळू पचणारे प्रथिने असतात, जे हळूहळू शरीरात सोडले जातात आणि पोट भरलेले ठेवतात. पनीरमध्ये कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स देखील असतात जी हाडे आणि स्नायूंच्या पुनर्प्राप्तीस मदत करतात.
तसेच अंडीही फायद्याची असतात. अंदाजे २ मोठ्या अंड्यांमध्ये (१०० ग्रॅम) १५५ कॅलरीज, १३ ग्रॅम प्रथिने, ११ ग्रॅम फॅट्स आणि १.१ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. अंड्यातील प्रथिने उच्च दर्जाची असतात. अंड्यांना ‘गोल्ड स्टँडर्ड प्रोटीन’ म्हणतात. कारण शरीर त्यांना चांगल्या प्रकारे शोषून घेते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी आणि सेलेनियम सारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा देखील समावेश असतो. त्यामुळे हे खाण्याला प्राधान्य देणारे अनेकजण आहेत.


