Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Crime : बर्थडे सेलिब्रेशनवेळी मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai Crime : बर्थडे सेलिब्रेशनवेळी मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; CCTV व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान एका २१ वर्षीय तरुणाला त्याच्याच पाच मित्रांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा क्रूर प्रयत्न केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर फेज-३ इमारतीत हा प्रकार घडला. तरुण आपला वाढदिवस साजरा करत असताना त्याचे मित्र केक कापण्याच्या बहाण्याने आले. केक कापताना अचानक त्यांनी तरुणावर पेट्रोल ओतले आणि त्याला पेटवून दिले. जाळल्यानंतर हे पाचही मित्र तिथेच नाचताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

या हल्ल्यात तरुण गंभीर भाजला असून त्याच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रांनी केलेल्या या क्रूर कृत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सखोल तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येईल, असे सांगितले जात आहे. या घटनेमुळे मुंबईत प्रचंड खळबळ माजली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!