Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Local Body Election : भाजपसाठी प्रचार का करतो म्हणत काँग्रेस नेत्याची तरुणाला बेदम मारहाण

Local Body Election : भाजपसाठी प्रचार का करतो म्हणत काँग्रेस नेत्याची तरुणाला बेदम मारहाण

नागपूर : कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारातून वातावरण तापले असताना, भाजप समर्थक असल्याच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वातावरणात तणाव वाढला असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पोलिस कारवाईविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी (२३ नोव्हेंबर) रात्री ११ वाजता कळमेश्वरमधील विसावा-बारसा परिसरात आरिफ लतीफ शेख (वय २८, रा. कळमेश्वर) फोनवर बोलत असताना आशिष ग्वालबंशी व हरीश ग्वालबंशी यांच्यासह ५-६ साथीदारांनी त्याला लक्ष्य केले. प्रथम शिवीगाळ केल्यानंतर आरिफला जबरदस्ती कारमध्ये बसवून नागपूरच्या दिशेने नेले.

कारमध्ये “तू काँग्रेससाठी काम का करत नाहीस? भाजपसाठी प्रचार का करतोस?” अशा प्रश्नांसह त्याला लाथा आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली. काही वेळाने त्याला रस्त्यावर सोडून दिले. आरिफचे मित्रांनी त्याला तात्काळ कळमेश्वर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

आरिफने सोमवारी (२४ नोव्हेंबर) कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीत हरीश ग्वालबंशी, आशू ग्वालबंशी, आशिष ग्वालबंशी यांच्यासह इतर ३-४ व्यक्तींची नावे घेतली आहेत. पोलिसांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) संध्याकाळी छापे टाकून हरीश ग्वालबंशी, आशू ग्वालबंशी यांच्यासह ३ आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींच्या शोधकामात पोलिस गुन्हे शाखेचा सहभाग आहे. बुधवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!