Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन वादामुळे माझा सँडविच होतो; रक्षा खडसे यांचे भावनिक वक्तव्य

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन वादामुळे माझा सँडविच होतो; रक्षा खडसे यांचे भावनिक वक्तव्य

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील दीर्घकाळापासून चालू असलेल्या वादाने पुन्हा एकदा वळण घेतले आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी या वादावर पहिल्यांदाच भावनिक प्रतिक्रिया देत ‘माझा सँडविच होतो’ असे वक्तव्य केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत बोलताना रक्षा खडसे यांनी हे विधान केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, खडसे कुटुंबातील राजकीय घुसमटेचे ते प्रतिबिंब मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील प्रसारसभेत रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, “एकीकडे नाथाभाऊ सासरे आहेत, तर दुसरीकडे मंत्री गिरीषकाका वडिलांसारखे आहेत. दोघांच्या वादामुळे माझा सँडविच नक्कीच होतो.

सासऱ्यांचा आदर आहे, तर गिरीषकाका पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने तेही जवळचे आहेत.” या वक्तव्याने रक्षा खडसे यांच्या द्विधा स्थितीचे वर्णन केले असून, ते या वादात अडकलेल्या भावना व्यक्त करत आहेत.

या वक्तव्यामागे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे आहेत. पत्रकारांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपच्या मतांमुळे निवडणुकीत विजय मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर रक्षा खडसे म्हणाल्या, “माझा विषय सोडा. भाजपची ताकद असल्याने मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील निवडून आले.

भाजपच्या मतांवरच शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला.” चोपडा येथे भाजप आणि अजित पवार गटाची युती असली तरी शिवसेना शिंदे गट विरोधात आहे, अशी परिस्थिती आहे. रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या प्रचारात सहभागी होत घरगुती वाद बाजूला ठेवला असल्याचेही सांगितले.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद हा जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा प्रमुख भाग आहे. एकेकाळी भाजपमधील जवळचे सहकारी असलेले हे दोन नेते आता वेगवेगळ्या पक्षांत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये आहेत, तर गिरीश महाजन भाजपचे नेते आणि मंत्री आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!