Horoscope Today : आजचे राशीभविष्य तुम्हाला तुमची नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांबद्दल फक्त अंदाज देते. दैनंदिन तसेच कुंडलीप्रमाणे ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे तुमचे तारे आज तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे सांगेल. आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य…
मेष : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुंटुंबात तणावाचे वातावरण राहील.
वृषभ : मिळकतीचा नवा मार्ग सापडेल. जोडीदाराला समजून घ्या.
मिथुन : नव्या ओळखी होतील. त्याचा व्यवसायात फायदा होईल.
कर्क : व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल आणि तो फायदेशीर ठरेल.
सिंह : कुणाला उसने पैसे दिले असतील, तर आज ते परत मिळतील.
कन्या : घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या.
तुळ : एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. घरात एखादा समारंभ होईल.
वृश्चिक : व्यवसायात फायदा मिळवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील.
धनु : घरातील वडिलधाऱ्या मंडळींची मदत होईल. संयमाने वागा
मकर : बोलताना जीभ सैल सोडल्यामुळे गैरसमज होतील.
कुंभ : भागीदारीत कोणतेही काम करू नका. कामाचा ठसा उमटवाल.
मीन : आर्थिक आणि व्यावसायिक कामे होतील. प्रवास करावा लागेल.


