Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! अकोल्यातील तरुण पदाधिकारी वैभव घुगेंची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! अकोल्यातील तरुण पदाधिकारी वैभव घुगेंची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

Akola Crime News: अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या विद्यार्थी आघाडीतील महानगरप्रमुख वैभव घुगे यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना आरटीओ रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकवर हा प्रकार घडला असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वैभव घुगे हे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, प्रारंभिक माहितीनुसार कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वर्तुळात या घटनेने शोककळा पसरली असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. धावत्या ट्रेनसमोर उडी घेत घुगेंनी आयुष्य संपवल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून समोर आले आहे.

हेही वाचा –बार्शीत वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची गळफास घेऊन आत्महत्या

राजकीय क्षेत्रातही या घटनेनंतर मोठी चर्चा रंगली असून पोलिसांपुढे आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान आहे. तथापी, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!