अंबरनाथ : अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरुन भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात घडली आहे. भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवेसना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे याने हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे याने केला आहे, या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता नसल्याचा आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अंबरनाथमध्ये बुवापाडा सर्वोदय नगर पॅनल क्रमांक पाचमध्ये प्रचार करण्यावरून झालेल्या वादात भाजपा कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांचावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, हल्ला करणारा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता असल्याची माहिती आहे या प्रकरणात सत्यम तेलंगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर ज्या शिवसेना उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी सत्यम तेलंगे वर हल्ला केला आहे.
शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला
शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगर- बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे गाडीतून जात असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. सुरुवातीला या हल्लेखोरांनी गाडीची नासधूस केली. हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. तसेच गाडीचे साईड मिरर फोडले. यानंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला. राम खाडे यांनी काही वार हातावर झेलले. परंतु, इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
राम खाडे यांच्यावर सुरुवातीला अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची शुद्ध पूर्णपणे हरपली होती. त्यांचा हात रक्तबंबाळ झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परंतु, राम खाडे यांच्यावर हल्ला कोणी केला, हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले.


