Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एक रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर निवडणुकीतून माघार घेईन; भरत शहा यांचे विरोधकांना खुले आव्हान

एक रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर निवडणुकीतून माघार घेईन; भरत शहा यांचे विरोधकांना खुले आव्हान

Indapur Election: इंदापूर नगरपरिषदेतील माझ्या कार्यकाळात “एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्यास मी तत्काळ निवडणुकीतून माघार घेईन, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी केले. माहितीचा अधिकार वापरून माझ्या कालावधीतील सर्व कामांची पडताळणी करा, असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. छत्रपती संभाजी चौकातील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, अशोक इजगुडे, अरविंद वाघ, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, आरपीआयचे शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या सीमा कल्याणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शहा म्हणाले, इंदापूर नगरपरिषदेची चतुर्थ घरपट्टी, शास्ती आणि दंडव्याज वाढल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दर्गा मज्जिद चौकातील सभेत मतदारांची जाहीर माफी मागितली होती. मागील निवडणुकीमध्ये चुकीचा उमेदवार दिला असल्याची कबुली हर्षवर्धन पाटलांनी दिली असे सांगून भरत शहा पुढे म्हणाले आम्ही निवडलेला नेताच चुकीचा होता की काय असा पलटवार केला.

हेही वाचा – इंदापूरचा चेहरा मोहरा बदल्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही; दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

मागील पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही भ्रष्टाचार केला असल्याचे आरोप विरोधक सातत्याने करत आहेत, आमच्या कार्यकाळातील प्रत्येक योजनेची माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवावी जर आम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल असे आढळल्यास या निवडणुकीतीतून त्याच क्षणी माघार घेतो असा इशारा शहा यांनी दिला.

नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शास्ती संदर्भात चुकीची माहिती देवू नये, शास्ती ही बेकायदेशीर झालेल्या बांधकामावर किंवा घरपट्टी न भरलेल्या मालमत्ता धारकांना बसते. राज्यसरकारने इंदापूर शहरातील शास्ती बसलेल्या मालमत्ता धारकांची व घरपट्टी लागलेल्या व्याजात सवलत द्यावी या आशयाचे पत्र आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालयाला, नवी मुंबई यांना 9/10/2025 रोजी देण्यात आलेले आहे. अभय योजनेमध्ये इंदापूर शहरातील मालमत्ता धारकांना शास्ती पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला आहे असे भरत शहा यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!