पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबई विद्यापीठात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मुंबई विद्यापीठात विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 152 रिक्त पद भरली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२५ ही असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mu.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल.
– एकूण रिक्त पदे : 152 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी : रु. ५००/- आणि राखीव वर्गासाठी : रु. २५०/-.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ डिसेंबर २०२५.


