Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपळाचे पान ठरते आरोग्यदायी; फुफ्फुसाचे आरोग्य राखता येतेच अन् अनेक औषधी गुणधर्मही मिळतात…

पिंपळाचे पान ठरते आरोग्यदायी; फुफ्फुसाचे आरोग्य राखता येतेच अन् अनेक औषधी गुणधर्मही मिळतात…

आपल्या निसर्गातील झाडे, फळे यांचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो. त्यात पिंपळाचे पान आरोग्यदायी ठरते. पिंपळाच्या पानात औषधी गुणधर्म असतात. याच्या पानांचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पिपळाच्या पानात अनेक पोषक तत्व असतात, जे अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करतात.

कॅल्शियम, मॅंगनीज, तांबे, लोह यांसारखी खनिजे आणि प्रथिने, फायबर यांसारखी पोषक तत्त्वे पिंपळाच्या पानात आढळतात. पिंपळाच्या पानात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीडायबेटिक गुणधर्म असतात, जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. पिंपळाची पाने फुफ्फुसासाठी फायदेशीर आहेत. पिंपळाच्या पानांचा रस फुफ्फुसांना डिटॉक्स करण्याचे काम करतो. हा रस प्यायल्याने फुफ्फुसातील जळजळ होण्याची समस्याही दूर होते.

तसेच जर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते. पिंपळाच्या पानात असलेले गुणधर्म खोकला दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. याच्या रसाचे सेवन केल्याने खोकल्याची समस्या दूर होते. हा रस प्यायल्याने श्लेष्माची समस्या देखील दूर होते.

याशिवाय, पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते. डायरिया सोबतच मळमळण्याची समस्या असेल तर या रसाच्या सेवनाने या समस्येपासून सुटका मिळते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!