Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गोंदियात पुन्हा बिबट्याची दहशत; वडिलांसमोर ९ वर्षीय रुचीला फरफटत नेलं, उपचारादरम्यान मृत्यू

गोंदियात पुन्हा बिबट्याची दहशत; वडिलांसमोर ९ वर्षीय रुचीला फरफटत नेलं, उपचारादरम्यान मृत्यू

Gondia Leopard Attack : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे शुक्रवारी सकाळी बिबट्याने ९ वर्षीय चिमुकलीवर प्राणघातक हल्ला केला. वडिलांसमोरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने रुची देवानंद पारधी (वय ९) हिला अक्षरशः फरफटत नेले. आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावण्यात यश आले, पण मुलीला गंभीर मार लागल्याने गोंदियातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ८ वाजता तिचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रुची ही वडिलांसोबत शेतात गेली होती. वडील देवानंद पारधी तारांचे कुंपण लावत होते, तर रुची शेताच्या बांधावर उभी होती. अचानक दबलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली आणि काही अंतर फरफटत नेले. रुचीच्या रडण्याचा आवाज ऐकून वडील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मोठ्याने ओरड केल्याने बिबट्या सोडून जंगलाकडे पळाला.

ग्रामीण भागात सतत वाढणारी बिबट्या दहशत आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांत गोंदिया जिल्ह्यात अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचा संशय; ७२ वर्षीय वृद्धाचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडला

सडक-अर्जुनी तालुक्यातील दोडके जंगल परिसरात शुक्रवारी ७२ वर्षीय वृद्ध कन्सु हन्नु उईके यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. २८ नोव्हेंबरपासून ते जंगलात सरपण आणण्यासाठी गेले होते आणि घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला.

परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याने वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोरेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला.

गोंदिया जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत बिबट्या आणि संभाव्य वाघाच्या हल्ल्यात दोन निरपराध जीव गमावल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ उपाययोजना आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!