नवी दिल्ली : सध्या बदलत्या काळात प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नातील काही रक्कम वाचवायची असते आणि ती अशा प्रकारे गुंतवायची असते की ज्यामुळे पैसे सुरक्षित राहतातच. शिवाय चांगला परतावाही मिळतो. अशा कोणत्या पर्यायाच्या शोधात तुम्ही असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे.
भारतीय पोस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु बचत योजना खूप लोकप्रिय आहेत. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (POST OFFICE RD) योजना, ज्यामध्ये तुम्ही नियमित गुंतवणूक करून केवळ व्याजातून २.५४ लाख कमवू शकता. सरकार स्वतः तुमच्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देते. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या बचत योजनांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे जोखीममुक्त आहेत. तुम्ही केलेली प्रत्येक गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेतून तुम्ही दरमहा फक्त ५००० गुंतवून ८ लाख जमा करू शकता आणि फक्त मिळणारे व्याज २.५४ लाखांपेक्षा जास्त असेल. सरकार या लघु बचत योजनेतील गुंतवणुकीवर ६.७% चा चांगला व्याजदर देते. तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेअंतर्गत खाते उघडू शकता.


