Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ; म्हणाल्या, ‘डॉ. गौरीनंतर माझा खून…’, चित्रा वाघ यांचेही नाव

पुण्यातील डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ; म्हणाल्या, ‘डॉ. गौरीनंतर माझा खून…’,  चित्रा वाघ यांचेही नाव

पुणे: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी गर्जे- पालवे यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडाली होती. पतीचे अफेयर, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून गौरीने आत्महत्या केली. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता पुण्यामधून स्नेहल घुगे या डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी डॉक्टर गौरी नंतर माझा बळी जाणार असे म्हणत आपबिती सांगितली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

डॉ. गौरीनंतर माझा बळी जाणार, असे म्हणत पुण्यातील डॉक्टर स्नेहल घुगे या विवाहितेने साडे तीन वर्षांपासून माझा छळ सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्नेहल घुगे यांनी भाजप आमदार नारायण कुचे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचेही नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. माझा शारीरीक, मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केला आहे.

डॉ. स्नेहल घुगे यांचे साडे तीन वर्षांपूर्वी रविंद्र महादेव घुगे यांच्याशी लग्न झाले, ते जालन्यातील अंबडचे रहिवासी आहेत. लग्नानंतर पतीचे दोन मुलींशी अफेयर होते, याबाबत विचारणा केल्यानंतर मला मारहाण केल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केला आहे. तसेच गेल्या 11 महिन्यांपासून पती मारहाण करुन फरार झाला आहे. घटस्फोट हवा असल्याने पती माझ्यासोबत राहत नाहीत, जाणून बुजून गायब असल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केली आहे.

डॉ. स्नेहल घुगेंनी सांगितलं की नणंद योगिता संजय सानप हिच्याकडूनही छळ होत आहे. ही आमदार नारायण कुचेंची कार्यकर्ती आहे. ती नारायण कुचेंचे नाव घेऊन वारंवार धमकी देत असते. आम्ही कुचे साहेबांचे नाव सांगितले अन् पाच दहा लाख रुपये दिले तर तु कोणतीही केस केलीस तरी आम्ही बाहेर पडू, अशा धमक्या ते देतात.

राजकीय कनेक्शन असल्याने पोलीस प्रशासनही मदत करत नाही. आम्ही संरक्षण देणार नाही, तक्रारही दाखल करुन घेणार नाही, तुम्ही लोकांच्या घरात घुसाल तर मार खाण्याची तयारी ठेव, असे उत्तर पोलीस अधिक्षकांनी दिल्याचाही आरोप स्नेहल घुगेंनी केला आहे. तसेच पोलीसांसमोर माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, असा आरोपही त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे.

याबाबत मी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही सांगितले, मात्र नारायण कुचेंचे नाव असल्याने त्यांनी मदत करण्यास टाळाटाळ केली. तु घटस्फोट घेऊन मोकळी हो, असा सल्ला त्यांनी दिला. मी आत्महत्या करणार नाही. माझा फक्त खून होऊ शकतो. माझा खून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तसं काही झाल्यास माझी सासरची मंडळी जबाबदार असतील असंही या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, भाजप आमदार नारायण कुचेंनी स्नेहल घुगेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी संबंधित महिलेला आणि तिच्या पतीला ओळखत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!