Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो?

नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो?

मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील 2 दिवसांत मतदान होऊन 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत भाजपने आपली मोठी टीम प्रचारासाठी मैदानात उतरवली असून अंतर्गत सर्व्हे देखील करण्यात आला आहे. भाजपच्या या सर्वेनुसार राज्यात भाजपचे 175 नगराध्यक्ष विजयी होतील. तर, महायुतीमध्ये आणि निवडणूक निकालांमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं पाहायला मिळेल, असा सर्व्हेचा अंदाज आहे. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या विजयाचा विश्वास आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून नगरपालिका निवडणुकांचा प्रचार आता दोन दिवसांत संपुष्टात येईल. तत्पूर्वी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असून नागरिकांना, मतदारांना विकासाचं, निधीचं आश्वासन देत आहेत. या प्रचारात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं दिसत असून भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक मंत्री प्रचारासाठी नगरपालिका पिंजून काढत आहेत. आता, भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला असून या नगरपरिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यात भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज सर्वेक्षणात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांचा विविध जिल्ह्यात जोरदार प्रचार आहे. राज्यात नगराध्यक्ष पदासाठी 242 ठिकाणी भाजप, तर 46 ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे, सर्वाधिक जागांवर भाजपचे उमेदवार असल्याने भाजपच मोठा भाऊ ठरेल, असा विश्वास आहे.

आम्ही 200 जागांवर नगराध्यक्षपद जिंकू – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात एकूण 280 जागांवर निवडणूक सुरू आहे. त्यामध्ये 256 ठिकाणावर भाजप कमळावर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी भाजप 200 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका भाजप जिंकेल असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ही धरुन आणलेली गर्दी नाही. देवेंद्र फडणवीस, आम्ही फिरतोय, त्यामुळे या निवडणुकीत बिहारसारखं आणि महाराष्ट्र विधानसभेसारखं यश मिळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. आम्हाला विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!