Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; कॉल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; कॉल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

पुणे: राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार मोठी गंभीर समस्या बनली असून पुणे शहरातील गुन्हेगारीही पोलिसांपुढे मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे, पुणे पोलिसांकडूनही सातत्याने सतर्कता बाळगली जाते. आता, शहरातील पंचतारांकित हॉटेल बॉम्बने उडवायची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. पुणे शहरातील कोरेगाव पार्कमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल संदर्भात ही घटना घडली होती. हॉटेल रिकामे करा, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय असा फोन हॉटेलच्या लँडलाईनवर आल्याने एकच धावपळ उडाली होती. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी केल्यावर हा ‘फेक कॉल’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि ग्राहकांनीही सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी एका मोबाईल नंबरवरून पुण्यातील कोरेगाव पार्क भागात असलेल्या पंच तारांकित हॉटेलच्या अधिकृत लँडलाईन फोनवर कॉल आला. मोबाईलवरुन संबंधित व्यक्तीने “हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा” अशी धमकी देण्यात आली होती. हॉटेल प्रशासनाने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या काही वेळातच पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक हॉटेलवर दाखल झाले. हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा खोटा व बनावट कॉल असल्याचे समोर आले, हा खोडसाळ प्रकार कोणी केला आणि का? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, हॉटेल व्यवस्थापनाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी, पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेलचे सिक्युरीटी मॅनेजर यांनी फिर्याद दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!