Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर नगरपरिषदेसाठी सरासरी 79. 89 टक्के मतदान; शहा-गारटकर यांच्यात काटे की टक्कर

इंदापूर नगरपरिषदेसाठी सरासरी 79. 89 टक्के मतदान; शहा-गारटकर यांच्यात काटे की टक्कर

Indapur Voting Percentage: इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ९७५० पुरुष, १० हजार ८३ , इतर ४ एकूण १९ हजार ८३७ मतदारांनी मताचा अधिकार बजावला असून सरासरी मतदान ७९. ८९ टक्के झाले आहे. इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार भरत शहा, कृष्णा-भिमा विकास आघाडी चे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी पहिल्या प्रहरात मतदानाचा अधिकार बजावला. नगरपालिकेचे निवडणूक जवळपास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबली असल्यामुळे मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.

सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत ९.७५ टक्के मतदान झाले. साडेनऊ नंतर मतदान केंद्रावर मतदारांचा वेग वाढला. साडे अकरा पर्यंत २४.९५ टक्के मतदान झाले. मतदानाचा वेग वाढतच गेला दुपारी दीड वाजेपर्यंत ४३.१८ टक्के पर्यंत पोहचला. साडेतीन वाजता ही टक्केवारी ६०.४१ पर्यंत गेली.

हेही वाचा – विकासासाठी सकारात्मक नवीन दृष्टी असणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने कौल द्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवारांची इंदापूरकरांना भावनिक साद

इंदापूर शहरातील परगावी नोकरीसाठी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. त्यामुळे सकाळी सात ते दहा या दरम्यान चा मतदारांचा आकडा वाढला. मतदानाचा हक्क बजावून ही मंडळी आपल्या कामावर परतली.

मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्राच्या खोलीपर्यंत जाईपर्यंत उमेदवार मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे काही मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये किरकोळ वादावाद झाली. काही मतदान केंद्रावर मशीनमध्ये चिन्ह दिसत नसल्याची तक्रारही करण्यात आली. इंदापूर शहरातील २७ मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३०८ पुरुष तर ७६८८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. २४ हजार ८२९ मतदारांपैकी १५ हजार मतदारांनी मतदान केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!