Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई! मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक

Sheetal Tejwani Arrest: पुण्यातील मुंढवा येथील तब्बल 40 एकर जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून, पोलिसांनी तिला दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. चौकशीत तिच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर अखेर तिच्यावर कारवाई करण्यात आली.

ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. संपूर्ण व्यवहारात मोठ्या आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मुख्य आरोपी म्हणून शीतल तेजवानीवर आरोप करण्यात आले होते.

हेही वाचा – Parth Pawar land dispute : पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर कोणताही आरोप नाही; समितीचा अहवाल समोर, तीन अधिकारी दोषी

दरम्यान, शीतल तेजवानीने आपल्यावरील दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत तिने मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे स्वतःला लक्ष्य केल्याचा दावा केला. मीडियामधील बातम्यांवरूनच एफआयआर नोंदवण्यात आला आणि स्वतःला फरार घोषित केल्याचा आरोपही तिने केला. मात्र तपासासाठी तिची उपस्थिती गरजेची असल्याचे सरकारी बाजूने सांगण्यात आल्यानंतर तिला दिलासा मिळाला नाही. यानंतर पुणे पोलिसांनी तिच्या अटकेची कारवाई केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!