पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला यवतमाळ येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ७२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 110000 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. १६ डिसेंबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ या पत्त्यावर सदर अर्ज पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.vngmcytl.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


