Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भारतात YouTube Recap झालं लाँच; ‘असा’ होईल त्याचा फायदा, तुम्ही पाहिलेले व्हिडिओ…

भारतात YouTube Recap झालं लाँच; ‘असा’ होईल त्याचा फायदा, तुम्ही पाहिलेले व्हिडिओ…

नवी दिल्ली : सध्या युट्यूबचा वापर वाढताना दिसत आहे. त्यात युट्यूबने पहिल्यांदाच त्यांचे रिकॅप फीचर लाँच केले आहे. हे फीचर स्पॉटिफाय रॅप्ड सारखेच असणार आहे. या नव्या फीचर्सच्या माध्यमातून युजर्सनी वर्षभरात काय पाहिले किंवा ऐकले याची माहिती दिली जाणार आहे. हे फीचर युट्यूब म्युझिकवर बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे, परंतु ते पहिल्यांदाच युट्यूब अॅपवर येत आहे.

या नव्या फीचर्सच्या माध्यमातून प्रत्येक युजर्ससाठी एक अनोखा अनुभव मिळणार आहे. ज्यामध्ये वर्षाच्या अखेरीस वैयक्तिकृत सारांश असतो. हे युट्यूब फीचर तुम्हाला वर्षभर प्लॅटफॉर्मवर तुम्ही काय पाहिले आहे ते सांगेल. युट्यूब रिकॅप युजर्सच्या Like आणि युट्यूब हिस्ट्री पाहता येणार आहे. तुम्ही भारतात युट्यूब अॅप किंवा त्याच्या वेब आवृत्तीवर हे फीचर अॅक्सेस करू शकता. ते रोल आउट करण्यात आले आहे. जर तुम्हाला हे फीचर अजून दिसत नसेल, तर ते येत्या काही दिवसांत दिसणार आहे.

तुम्हाला एक अतिशय सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल. प्रथम, तुम्हाला YouTube उघडावे लागेल. तुम्ही फोन, टीव्ही किंवा डेस्कटॉप असो, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अॅप किंवा वेब व्हर्जन अॅक्सेस करू शकता. नंतर तुम्हाला तुमच्या YouTube खात्यात लॉग इन करावे लागेल. बहुतेक लोकांच्या फोनवर ते आधीच लॉग इन केलेले असणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!