पुणे : कृषी विज्ञान केंद्र, येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे टेक्नॉलॉजी एक्सपर्ट या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला बुलढाणा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : टेक्नॉलॉजी एक्सपर्ट.
– रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : बुलढाणा.
– वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 12,000/-.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : १२ डिसेंबर २०२५
– मुलाखतीचा पत्ता : वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांचे कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, अजिंठा रोड, बुलढाणा.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kvkbuldana.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


