Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rupali Thombre: 2005 मधील फोटो शेअर करत रुपाली ठोंबरेंनी दिला खास संकेत; अखेर कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Rupali Thombre: 2005 मधील फोटो शेअर करत रुपाली ठोंबरेंनी दिला खास संकेत; अखेर कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

Rupali Thombre: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील ठोंबरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात झालेल्या जोरदार वादानंतर पक्षातील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही महिला नेत्या एकमेकींवर आरोपांची सरबत्ती करत असताना हा वाद थेट पक्षांतराच्या चर्चेपर्यंत पोहोचला. वादानंतर काही दिवसांनी अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरे यांनी पक्षातील अनेक जबाबदाऱ्या सोडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पक्षात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. त्यात भर म्हणून आता ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्याने खळबळ उडाली आहे. ‘साम-दाम-दंड-भेद’ असा उपरोधिक उल्लेख करत त्यांनी टाकलेल्या पोस्टमुळे त्यांच्या पुढील राजकीय प्रवेशाच्या निर्णयाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ठोंबरे यांना नोटीसही बजावली होती. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले होते. या घडामोडींमुळे त्या पक्षाप्रती अस्वस्थ असल्याची चर्चा रंगू लागली होती. अशातच ठोंबरे यांनी आज फेसबुकवर दोन फोटो शेअर केले. एक शरद पवारांसोबतचा जुना फोटो आणि दुसरा शरद पवार व दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो. या फोटोंमुळे आता रुपाली ठोंबरे यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही सांगितलं

रुपाली ठोंबरेंनी पोस्टद्वारे दिले संकेत

दरम्यान, आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘पहिला फोटो 2005 सालचा आहे. त्या काळापासून मी समाजात आणि राजकारणात मनगटी ताकद वापरत काम करण्याची वाटचाल सुरू केली. दुसरा फोटो महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ, दिग्गज आणि जनमान्य नेत्यांचा. त्यामुळे आयरे-गैरे, नथू-खैरे लोकांनी मला शिकवण्याची गरज नाही. #साम_दाम_दंड_भेद’. या पोस्टमधील दोन्ही फोटोंमध्ये शरद पवारांचा सहभाग असल्याने, त्या अजित पवार गटातून बाहेर पडून शरद पवारांच्या गटात जाणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस; 10 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा

खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र ती भेट खाजगी कारणासाठी होती, असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले होते. तरीही आजच्या पोस्टनंतर त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे. मात्र, हे फक्त राजकीय अंदाज आहेत. रुपाली ठोंबरे पुढे कोणता मार्ग स्वीकारणार याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!