Indigo Flight Cancellation: देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोमध्ये गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले असून, तब्बल 1,000 पेक्षा जास्त उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत. या गोंधळामुळे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूरू, अहमदाबादसह अनेक प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले. वाढलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली.
सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी
या घटनाक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन दिवसांपासून हजारो लोकांची गैरसोय होत असताना केंद्र सरकार शांत कसे राहू शकते? इंडिगोवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी थेट संसदेत याबाबत सरकारकडून स्पष्टीकरणही मागितले.
लाईव्ह |📍चैत्यभूमी, दादर, मुंबई | पत्रकारांशी संवाद |🗓️06-12-2025
https://t.co/9ggmSgSNL4— Supriya Sule (@supriya_sule) December 6, 2025
पूर्वसूचना न देता एवढा मोठा गोंधळ कसा?
इंडिगोसारख्या मोठ्या विमान कंपनीकडून अशी बेफिकिरी अपेक्षित नव्हती. कोणतीही पूर्वसूचना नाही, नियोजन नाही, आणि प्रवाशांचा लाखोंचा तोटा सहन करावा लागत आहे, असे म्हणत सुळेंनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, देशात इंडिगोसारख्या किमान पाच पर्यायी कंपन्या उभ्या केल्यास स्पर्धा निर्माण होईल आणि अशा परिस्थितीला आळा बसेल, असेही त्यांनी सुचवले.


