Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kolhapur: बॉल शोधण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला! कोल्हापूरात क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Kolhapur: बॉल शोधण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला!  कोल्हापूरात क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाईवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. शाळेला सुट्टी असल्याने घराबाहेर खेळायला गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मयत बालकाचे नाव अफान असिफ बागवान असे असून, या अचानक घडलेल्या प्रसंगाने परिसरातील नागरिकांत खळबळ उडाली आहे.

विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

अफान आणि त्याचे मित्र मैदानात खेळत असताना क्रिकेटचा चेंडू जवळच्या हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या छतावर गेला. बॉल आणण्यासाठी अफान टेरेसवर चढला. मात्र त्या इमारतीच्या अत्यंत जवळून 11,000 व्होल्ट उच्चदाब विद्युत वाहिनी जात होती. फक्त दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या या लाइनचा स्पर्श होताच अफानला जोराचा विद्युत धक्का बसला. धक्का एवढा तीव्र होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

हेही वाचा – Pandharpur News : बाळाला जन्म दिला, नंतर त्रास वाढला; एका चुकीमुळे २२ वर्षीय महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर अपघात

दरम्यान, कोल्हापूरमध्येच आणखी एक गंभीर घटना घडली. कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील चुये फाटा परिसरात व्हॅन आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शिवाजी शंकर कोळी (45, रा. कागल) आणि व्हॅन चालक अतुल अरविंद पाटील (30, रा. गुडाळ, ता. राधानगरी) यांचा मृत्यू झाला. धडकेत व्हॅनमधील गजानन प्रभाकर चौगले, अनिल शिवाजी जाधव, तसेच दुचाकीवरील वैशाली शिवाजी कोळी आणि त्यांची नात सुप्रिया चेतन दळवी (वय 3) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!