Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका

पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका

पुणे : येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत, असा स्पष्ट संदेश शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढण्याचा आदेश पवारांनी दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली असता, पुणे शहराच्या निवडणूक तयारीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्ण पूर्णविराम लागल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.

प्रशांत जगताप म्हणाले, “आज मी शरद पवार साहेबांची भेट घेतली. त्यांनी वेळ दिली आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीबाबत सखोल चर्चा केली. आम्ही एमव्हीए सोबत लढलो तर काय होईल, इतरांशी युती केली तर काय परिणाम येतील, याचा सविस्तर आढावा घेतला. पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले की, पुणे आणि राज्यभरातील महानगरपालिका निवडणुका फक्त एमव्हीएच्या माध्यमातूनच लढाव्यात. शशिकांत शिंदे यांच्याशीही पवार साहेबांनी बोलले असून, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.”

जगताप यांनी पुढे सांगितले, “सर्व नेत्यांची मते पवार साहेबांसमोर मांडली. पक्षाचा किंवा पवार साहेबांचा वेगळा विचार नाही. आम्ही एमव्हीए म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शशिकांत शिंदे हा निर्णय लवकरच जाहीर करतील.” काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना, जगताप यांनी ठाम विरोध दर्शवला होता. “जर दोन्ही गट एकत्र आले तर मी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन,” असा पवित्रा त्यांनी घेतला होता. आजच्या भेटीनंतर हा मुद्दा निकालात निघाला असल्याचे दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार होत आहेत. काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. पुण्यातही अशी शक्यता होती, मात्र शरद पवार गटाने एमव्हीएवरच विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एमव्हीएतील काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील युती मजबूत होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुणे महापालिकेच्या १६५ प्रभागांसाठी उमेदवारांची अंतर्गत निवड प्रक्रिया सुरू असून, जगताप यांनी स्वारर्थींना अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!