Today गुरूवार, 6th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indu Mill Smarak: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखचं सांगितली

Indu Mill Smarak: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखचं सांगितली

Indu Mill Smarak: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात आज, 6 डिसेंबर रोजी भाविकांचा महासागर उसळला. कालपासूनच अनुयायांचे मोठ्या प्रमाणावर आगमन सुरू झाले असून परिसरात सतत गर्दी वाढत आहे. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. चैत्यभूमीवरील भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमध्ये उभारल्या जात असलेल्या आंबेडकर स्मारकाबाबत महत्त्वाची माहिती दिली. पुढील वर्षीच्या 6 डिसेंबरपर्यंत हे स्मारक सर्वार्थाने उभं राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निमित्ताने बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा एक विशेष संदर्भही उपस्थित केला. अलीकडेच मुंबईत भेट दिलेल्या अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्याच्या गव्हर्नरांनी तेथील वीज व्यवस्थेतील अडचणींचा उल्लेख केला. न्यूयॉर्कसह अनेक शहरांना स्टेट ग्रीडमुळे वीजटंचाईचा सामना करावा लागतो, कारण त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील एकत्रित ग्रीड नाही, असे त्यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, ‘वीज मंत्रीपद स्वीकारल्यावर संपूर्ण देशाला जोडणाऱ्या नॅशनल पॉवर ग्रीडची कल्पना मांडणारे बाबासाहेब किती दूरगामी विचार करणारे होते, याची जाणीव यावेळी अधिक प्रकर्षाने झाली. आज भारतात कोणत्याही राज्यातून दुसऱ्या राज्यात सहजपणे वीज पुरवठा करता येतो. हा बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. जे प्रगत राष्ट्र लक्षात घेऊ शकले नाही, ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दशकांपूर्वीच ओळखलं होतं.’

हेही वाचा –Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील महिलांना लखपती बनवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

इंदू मिल स्मारकाच्या कामाला गती

दरम्यान, इंदू मिल परिसरात उभारल्या जात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाविषयीही मुख्यमंत्र्यांनी ताजे अपडेट दिले. पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत स्मारक पूर्णत्वास नेण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. दादरमधील या स्मारकात 450 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2015 रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. बांधकामाच्या विविध टप्प्यांना वेग आला असून डिसेंबर 2026 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा विश्वास महायुती सरकारने व्यक्त केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!