लग्न ही अशी एक कौटुंबिक परंपरा आहे ती वर्षानुवर्षे आपण पाळत असतो. नातेसंबंध टिकवणे हे गरजेचे असते. त्यामुळे कधी समजूतदारपणाही दाखवावा लागतो. अलीकडेच अभिनेता गोविंदा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच सुरु होत्या. पण, या सर्व गोष्टींवर गोविंदा यांच्या पत्नी सुनीता यांनी विधान केले आहे.
१९८७ मध्ये सुनीता आहुजा यांच्याशी गोविंदा यांनी लग्न केले. त्यांचे लग्न तुटल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. सुनीता या त्यांच्या चपळ बुद्धी, साधेपणा, स्टाईल आणि गोविंदासोबतच्या नात्यासाठी ओळखल्या जातात. सार्वजनिक कार्यक्रम असोत किंवा कौटुंबिक मेळाव्यात, हे जोडपे नेहमीच आवडते. सुनीता आहुजा यांना नातेसंबंधाबाबत विचारण्यात आले होते. त्यात नात्यातील शारीरिक फसवणूक अधिक क्षम्य आहे की भावनिक फसवणूक? तुमच्या नात्यात कोणती फसवणूक जास्त वेदनादायक आहे?
त्यावर सुनीता यांनी विधान केले. ‘भावनिक…’ तुम्ही एखाद्यावर भावनिक प्रेम करता आणि नंतर तुम्ही त्यांना फसवता. हे बरोबर नाही. कारण मी खूप भावनिक आहे. मी माझ्या मृत्यूपर्यंत गोविंदावर प्रेम करेन. जर कोणी भावनिकरित्या माझा विश्वासघात केला, मग ती माझी मुले असोत किंवा माझा नवरा, तर मला खूप दु:ख होईल. कोणीही भावनिक फसवणूक करू नये; ते बरोबर नाही.”
तसेच “शारीरिक फसवणूक देखील केली जाऊ नये. हे दोन्ही का करावे? मला वाटते की या गोष्टी चांगल्या नाहीत. आपल्या पालकांनी अशी मूल्ये रुजवली नाहीत. त्याची गरज नाही. शारीरिक फसवणूक ही अशी स्थिती आहे जेव्हा जोडीदार दुसऱ्याशी शारीरिक संबंध निर्माण करतो. तर भावनिक फसवणुकीत एक जोडीदार दुसऱ्याशी भावनिक जोड, खोल संभाषण, गुप्तता किंवा आसक्ती विकसित करतो, ज्यामुळे नात्याचे भावनिक बंधन संपते”. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


