मुंबई : बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन सध्या त्याची बहिण कृतिकाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कार्तिक लग्न समारंभात चांगलाच धावपळीत दिसून आला. लग्नात अनेक पाहुण्यांचा पाहुणचारही त्याने केल्याचे पाहिला मिळाले. त्यात कार्तिक आर्यन हा भावूक झाल्याचेही समोर आले. याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.
कार्तिकने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा देताना कार्तिकने इन्स्टाग्रामवर लिहिले, “असे काही दिवस असतात जे शांतपणे तुमचे जग बदलून टाकतात. आजचा दिवस त्यापैकी एक होता. माझ्या किकीला वधू म्हणून पाहताना असे वाटले की क्षणार्धात वर्षे निघून जातात. किकी, मी तुला माझ्यामागे सर्वत्र येणाऱ्या लहान मुलीपासून, या सुंदर वधूपर्यंत वाढताना पाहिले आहे जी आज खूप आनंद आणि ताकदीने तिच्या नवीन जीवनात जात आहे”.
तसेच पुढे म्हटले की, तुमच्या सर्वांचा मला अभिमान आहे, तुमच्या मूल्यांचा अभिमान आहे आणि शेअर केलेल्या प्रत्येक फन, भांडण, सिक्रेट्स आणि आठवणींसाठी मी ऋणी आहे. आज, तुम्ही पुढे जाताना, माझे मन तुमच्यासोबत राहील. तुम्ही कदाचित एक नवीन अध्याय सुरू करत असाल. मात्र, तू नेहमीच माझी लहान बहीण आमच्या कुटुंबाच्या हृदयाची धडकन राहशील.


