पुणे : भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज आता करता येणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला भंडारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी
– एकूण रिक्त पदे : 65 पदे.
– नोकरीचे ठिकाण : भंडारा.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी.
– मुलाखतीचा पत्ता : डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://gmcbhandara.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


