Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Press Club: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! पुणे प्रेस क्लबसाठी नव्या प्रशस्त जागेला मंजूरी

Pune Press Club: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! पुणे प्रेस क्लबसाठी नव्या प्रशस्त जागेला मंजूरी

Pune Press Club: पुण्यातील पत्रकारांसाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला. सेनापती बापट रस्त्यावरील सुमारे ८,०१५ चौरस फूट जागा पुणे प्रेस क्लबसाठी देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रेस क्लबसाठी अत्याधुनिक इमारत उभारणार

पुण्यातील पत्रकारांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. या जागेवर आधुनिक सुविधा असलेली प्रशस्त इमारत उभारली जाणार असून पत्रकारांसाठी विविध उपक्रम, कार्यशाळा आणि सभा आयोजित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही जागा असेल.

हेही वाचा – मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा! पुणे महापालिका केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार

जमिनीचा तांत्रिक तपशील आणि मंजुरी

ही जागा पुणे शहरातील मौजे भांबुर्डा, टी.पी.१, अंतिम भूखंड क्र. ८८१/ए येथे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 40 तसेच 1971 च्या नियमांनुसार शासकीय जमिनींच्या विल्हेवाटीच्या नियमांचे पालन करून, प्रचलित बाजारदरानुसार शुल्क आकारून ही जमीन ‘वर्ग-२’ भोगवटादार हक्काने देण्याचा निर्णय करण्यात आला.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव

निर्णयानंतर महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, पुणे पत्रकार प्रतिष्ठान वर्षभर पत्रकारांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, अभ्यास दौरे, वैद्यकीय तपासणी, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला पत्रकारांसाठी विशेष उपक्रम असे अनेक कार्यक्रम राबवते. संस्थेच्या कामाचा व्याप गेल्या काही वर्षांत खूप वाढला असून सदस्यसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नामांकित मंत्री, न्यायाधीश, वरिष्ठ अधिकारी, संपादक यांची व्याख्याने आयोजित करण्यासाठी मोठ्या, सुसज्ज जागेची गरज भासू लागली होती. म्हणूनच पत्रकारांच्या हिताची आणि माध्यम क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी ठेवून ही जागा प्रदान करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका

पत्रकारांसाठी मोठा दिलासा

या निर्णयामुळे पुण्यातील पत्रकारांना अत्याधुनिक सुविधा असलेले कायमस्वरूपी केंद्र मिळणार असून आगामी काळात त्याद्वारे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!