पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूर येथे आयुर्वेदिक डॉक्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन), एनटीपीसी लिमिटेड सोलापूर एसटीपीपी, गाव फटाटेवाडी, पोस्ट होटगी स्टेशन, जिल्हा सोलापूर, -४१३२१५ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.ntpc.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : आयुर्वेदिक डॉक्टर.
– नोकरीचे ठिकाण : सोलापूर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 65000 रुपये
– वयोमर्यादा : ५५ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ डिसेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : ntpcsolapur@ntpc.co.in


