Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Buldhana Accident : कापूस वेचायला जाणाऱ्या महिला मजुरांच्या पिकअपला एसटीची धडक; २ ठार, ५ गंभीर जखमी

Buldhana Accident : कापूस वेचायला जाणाऱ्या महिला मजुरांच्या पिकअपला एसटीची धडक; २ ठार, ५ गंभीर जखमी

Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात जाफराबाद-जालना महामार्गावर आज सकाळी कापूस वेचणीला जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाला मागून भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या.

मायाबाई सुरज काजळे (वय ३२), रा. रामखेडा, ता. खगनार, जि. बुरहानपूर (मध्य प्रदेश), रिचाबाई काल्या कासदेकर (वय ७२), रा. नांदुरी, ता. धारणी, जि. अमरावती अशी मृत महिला मजुरांची नावे आहेत.

या महिला मजूर कापूस हंगामात काम करण्यासाठी देऊळगाव राजा परिसरात आल्या होत्या. रोजच्या सवयीप्रमाणे त्या पिंपळगाव राजा येथील कापूस शेतात वेचणीला जात होत्या. सकाळी पिकअपमध्ये चढत असतानाच हा अपघात घडला.

अपघातानंतर जखमींना तात्काळ देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पाचही गंभीर जखमी महिलांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातानंतर एसटी बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!