Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अखेर वाद मिटला..! सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार; जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला

अखेर वाद मिटला..! सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार; जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीत मोठी घडामोडी घडल्या आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाढत्या वादानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह प्रमुख महापालिकांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील दिल्लीतील खलबतांनंतर नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत कलह संपला असून, जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या २९ महापालिका निवडणुकांसाठी एकजूट दिसून येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील जागावाटप वाद, पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीमुळे निर्माण झालेल्या तणावावर पडदा पडला.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा आणि अंतर्गत संघर्ष टाळण्याचा निर्णय घेतला. या बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये युती व्हावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. महायुती एकत्र लढवून ५१ टक्के मतांचा आकडा गाठेल आणि बहुमत मिळवेल.”

जागावाटप फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी ४-५ पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्या स्थानिक पातळीवर प्राथमिक चर्चा करतील आणि अंतिम निर्णयासाठी फडणवीस, शिंदे व अजित पवार यांच्याशी बोलणार आहेत. मुंबईत भाजपला १३५-१४० जागा आणि शिवसेनेला ९०-१०० जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर येथे दोन्ही पक्ष एकत्र लढतील. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे रिंगणात उतरतील, यामुळे बंडखोरी टाळता येईल. नवी मुंबईसाठी अद्याप निर्णय बाकी आहे.

दरम्यान, डिसेंबर २ रोजी झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये (२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती) महायुती घटक पक्ष एकमेकांविरुद्ध लढले, ज्यामुळे हिंसाचार आणि वाद झाले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी “युती धर्म पाळावा” असे आवाहन केले होते. आता महापालिका निवडणुकांसाठी एकजूट दाखवून महायुती महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!