Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दुर्दैवी घटना..! पुण्यात पतंग उडवताना रेल्वेच्या धडकेत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दुर्दैवी घटना..! पुण्यात पतंग उडवताना रेल्वेच्या धडकेत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पुणे : मकर संक्रांतीच्या तोंडावर पुण्याच्या हडपसर परिसरात हृदयद्रावक घटना घडली. पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ११ वर्षांच्या मुलाला रेल्वेच्या धडकेत प्राण गमावावे लागले. ससाणेनगर येथील पुणे-सातारा रेल्वे मार्गावर बुधवार सायंकाळी घडलेल्या या अपघातानंतर गुरुवारी सकाळी मुलाचा मृतदेह आढळला.

मृत मुलाचे नाव प्रकाश डबले भुल (वय ११) असून, तो मूळचा नेपाळचा रहिवासी होता. हडपसरमधील गीतगंधर्व सोसायटीत कुटुंबासोबत राहणाऱ्या प्रकाश सायंकाळी सहा वाजता पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. चिंतेत असलेल्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्री शोध मोहीम राबवली, पण प्रकाशचा काही पत्ता लागला नाही.

गुरुवारी (११ डिसेंबर) सकाळी सव्वासात वाजता ससाणेनगर बोगद्याजवळील रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या ट्रॅकमॅन प्रमोद सक्सेना यांना प्रकाशचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ काळेपडळ पोलीसांना सूचना दिली. प्राथमिक तपासात असे निदर्शनास आले की, पतंग उडवताना प्रकाश रेल्वे ट्रॅकवर गेला आणि पुणे-सातारा मार्गावरील ट्रेनच्या धडकेत जखमी झाला. अपघात इतका प्रचंड होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

काळेपडळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. अपघातस्थळी रेल्वे मार्गावरील भुयारी भाग असल्याने पतंग उडवण्यासाठी मुले तेथे जाण्याचा धोका वाढतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रकाशच्या कुटुंबावर या घटनेमुळे शोककळा पसरली असून, शेजाऱ्यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!