Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra AI Hub: मायक्रोसॉफ्टची राज्यात मोठी गुंतवणूक; लाखो लोकांना मिळणार रोजगार

Maharashtra AI Hub: मायक्रोसॉफ्टची राज्यात मोठी गुंतवणूक; लाखो लोकांना मिळणार रोजगार

Maharashtra AI Hub: महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी गुंतवणूक खेचण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. मायक्रोसॉफ्टच्या या भेटीसाठी फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनातून तातडीने मुंबई गाठली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार करत असून GCC – Global Capability Center उभारण्यासाठी राज्य सरकार आणि कंपनी यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. सुमारे 20 लाख चौरस फूट जागेत हा भव्य GCC प्रकल्प उभारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – महाराष्ट्रात हुडहुडी..! परभणीचा पारा ५.५ अंशांवर, १४हुन अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट; आजचे हवामान काय?

45 हजार नवीन रोजगारांची निर्मिती

या प्रकल्पामुळे सुमारे 45,000 रोजगार निर्माण होणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात लवकरच सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला AI हब बनवण्याबाबत मायक्रोसॉफ्टने सकारात्मक भूमिका दाखवली असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान कंपनीच्या Prime AI OS चे सादरीकरण करण्यात आले. तसेच आरोग्य, शिक्षण, शेती यांसारख्या विविध क्षेत्रांत AIचा कसा प्रभावी वापर करता येईल, यावरही चर्चा झाली.

हेही वाचा –Hurda Party: मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांनी केली कुमार सानूच्या ‘या’ गाण्याची फर्माइश

मायक्रोसॉफ्टची भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक

सत्या नडेला यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत मोठी घोषणा केली. मायक्रोसॉफ्ट 17.5 अब्ज डॉलर (सुमारे 1.57 लाख कोटी रुपये) भारतात गुंतवणार आहे. ही कंपनीची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. नडेला म्हणाले, भारताच्या AI-युक्त भविष्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे, लाखो लोकांना नवीन कौशल्ये देणे आणि डेटा सुरक्षेला बळकटी देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भारताच्या भविष्यासाठी ही गुंतवणूक अत्यंत निर्णायक ठरेल. या बैठकीमुळे महाराष्ट्रात मोठी तंत्रज्ञानक्रांती घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!