Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Hurda Party: मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांनी केली कुमार सानूच्या ‘या’ गाण्याची फर्माइश

Hurda Party: मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांनी केली कुमार सानूच्या ‘या’ गाण्याची फर्माइश

Hurda Party In Nagpur: हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सर्व राजकीय नेतेमंडळी एकत्र आली आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आमदार मंगलप्रभात लोढा यांनी हुर्डा पार्टीचे आयोजन केले होते. मंगलप्रभात लोढा यांनी आयोजित केलेल्या या खास कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गाण गायलं. या कार्यक्रमात नार्वेकर यांनी “एक दिन मिट जायेगा माती के मोल” हे गीत जमलेल्या सर्वांना समर्पित केले. त्यांच्या गाण्यावर मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि इतर पाहुण्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमभर वातावरणात हलके-फुलके क्षण पसरल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

फडणवीस यांच्याकडून आशिकी चित्रपटातील गाण्याची फर्माईश –

दरम्यान, हुरडा पार्टी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गाण्याची विनंती करत कार्यक्रमात रंग भरला. कुमार सानू यांच्या आवाजात लोकप्रिय झालेलं आशिकी चित्रपटातील एक गाणं ऐकण्याची त्यांची इच्छा व्यक्त होताच, उपस्थितांनीही त्यांचे कौतुक केले. फडणवीस यांच्या फर्माईशने कार्यक्रमाला अजूनचं रंग चढला.

हेही वाचा –Indu Mill Smarak: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखचं सांगितली

तथापी, विविध पक्षांतील नेते एका मंचावर एकत्र येऊन गाण्यांत रमल्याने सभागृहातील दैनंदिन तणावाला क्षणभर विश्रांती मिळाली. काही नेत्यांनी तर स्टेजवर जाऊन नार्वेकरांना साथ देत वातावरणात आणखी रंग भरला. अधिवेशनादरम्यान, असा निवांत आणि आनंदी कार्यक्रम रंगल्याने बहुआयामी राजकीय नातेसंबंधांतील सौहार्दही अधोरेखित झाले.

हेही वाचा –देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

मागील वर्षी लोढा यांनी अशाच प्रकारचा कार्यक्रम करून चर्चेत आले होते, आणि यंदाही त्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाने नेत्यांच्या गेट-टुगेदरला उत्साहाची नवी झळाळी मिळाली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!